🕒 1 min read
औरंगाबाद : नांदेड रेल्वे विभागातील २० विशेष रेल्वेगाड्यांमधील काही डब्बे पूर्णपणे अनारक्षित करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोरोनाच्या गेल्या दिड ते दोन वर्षांच्या काळात अनारक्षित रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे साधारण परिस्थिती असलेल्या तसेच गरजू प्रवाशांचे मोठे नुकसान होत होते. आता रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे.
२७ ऑगस्ट नरसापूर ते नगरसोल डी एल १, २ तर २८ ऑगस्ट रोजी याच क्रमांकाचे डबे नगरसोल – नरसापूर रेल्वेत अनारक्षित असतील. याच दोन दिवशी औरंगाबाद ते रेनीगुंठा आणि रेनीगुंठा ते औरंगाबाद रेल्वेत डी एल १ आणि २ डबे अनारक्षित राहतील. ३०, ३१ ऑगस्टला काचीगुडा -अकोला आणि अकोला – काचीगुडा रेल्वेत डब्बा क्रमांक डी एल १ आणि २ हे जनरल डबे असतील.
२७ ऑगस्ट रोजी नांदेड औरंगाबाद रेल्वेतील डी एल १ आणि २ व एस ४ आणि ९ अनारक्षित असतील. याच क्रमांकाचे डब्बे ३० ऑगस्ट रोजी औरंगाबाद ते नांदेड रेल्वेत अनारक्षित राहणार आहेत. काेराेना काळात गर्दी हाेत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावर तिकिट देणे बंद करून सर्व गाड्या आरक्षित करण्यात आल्या हाेत्या. रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने आता अनारक्षित डबे जाेडून रेल्वे प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी थांबणार नाही…’; उर्वरीत जन आशीर्वाद यात्रेबाबत नारायण राणेंची घोषणा
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- राणे प्रकरणातही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; ‘विरोधात’ही दानवे-खैरे यांची तोंडे ‘विरुद्ध’ दिशेला!
- ‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान


