Share

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! विलगीकरण कालावधीत होणार घट

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या २ जुन रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मुंबईत विलगीकरणात रहावे लागणार आहे.

यानंतर इंग्लंडला गेल्यानंतर भारतीय संघाला पुन्हा एकदा विलगीकरणात रहावे लागणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघाला १० दिवस विलगीकरणाचा कालावधी पुर्ण करावा लागणार आहे. मात्र नुकत्याच बीसीसीआयने केलेल्या विनंतीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने विलगीकरणाचा कालावधी कमी करत १० ऐवजी ३ दिवसांवर आणला आहे. याबरोबरच भारतीय खेळाडूंना चौथ्या दिवसांपासून सरावाची परवानगी दिली गेली आहे.

भारताचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ एकाच विमानातून इंग्लंडला रवाना होणार आहेत. पुरुष संघाला न्यूझीलंड विरुद्धजागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून या कालावधीत होणारा हा सामना साउथम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे. यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. दुसरीकडे भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी ब्रिस्टलला जाणार आहे. यानंतर महिला संघ एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!