Share

बीडमध्ये मान्सूनपूर्व आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम

Published On: 

बीड: कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढताच आहे तसेच येथील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे, त्यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच आता पावसाळा सुरू होणार त्यामुळे मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळी दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याची शक्याता असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात येत आहे.

शहरातील कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी व मान्सूनपूर्व तयारीसाठी बीड नगर पालिकेच्या वतीने १५ दिवसापासून स्वच्छता, निर्जुंतीकीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोठी टीम कार्यरत आहे. बीड शहरातील अनेक ठिकाणचे नाले तुंबलेले आहेत. त्यात वाढते कोरोना रुग्ण व त्याचा संसर्ग थांबावा यासाठी दोन अत्याधुनिक सॅनिटायझर फवारणी यंत्रे जे की इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत सॅनिटायझर फवारणी करत आहे.

आरोग्याच्या ही सर्व यंत्रणा काम करत असून वार्डातील नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरीक या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवत मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या भागातील पाहणी केल्यानंतर या स्वच्छते निर्जंतुकीकरण मोहिमेत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभागी होवून आपल्या भागातील स्वच्छता व कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!