Share

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येवल्यात लिलाव सुरू होणार

Published On: 

नाशिक : लॉकडाऊन मधून शेतीला वगळण्यात आले आहे. परंतु तरी ही गर्दी होऊन धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनेक बाजार समित्या बंद आहेत. याच दरम्यान येवला येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या शनिवार पासून कांद्याचा लिलाव भरवण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आदल्या दिवशी बाजार समितीमध्ये येऊन ट्रॅक्टरची नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच शेतकरी लिलावात सहभागी होऊ शकतात. नोंदणी करा मगच लिलावात सहभागी व्हा, असे आवाहन सभापती उषा शिंदे यांनी केले आहे.

सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यासंदर्भात बैठक पार पडून हा निर्णय घेण्यात आला. ज्या ट्रॅक्टरची नोंदणी नसेल त्यांनी ट्रॅक्टर येवल्यात आणू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. येवल्यात पहिल्या दिवशी ५०० ट्रॅक्टरची नोंदणी होईल.

शनिवारी सकाळी नोंदणी झाल्याचे पास दाखवल्यावर ट्रॅक्टर आत प्रवेश करेल. लिलाव सुरळीत पार पडावेत मात्र गर्दी होऊ नये यासाठी नोंदणी करण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये दाखल होताना शेतकरी, व्यापारी सर्व मंडळींनी मास्क किंवा रुमाल बांधूनच आत यावे, स्वतः आपली काळजी घ्यावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. तसेच बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, असे देखील बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!