मुंबई : दरवर्षी मान्सूनचे लवकर आगमन होते पण यावर्षी मान्सून ३ दिवस उशिरा दाखल झाला आहे. पण आता राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे जोरदार आगमन झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई मध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झालेले आहे. राज्यात काही भागांमध्ये पेरणी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल मुंबईच्या बऱ्याच परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागात मान्सून दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईमधील सात तलाव क्षेत्रात २७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उष्णतेने व्याकुळ झालेल्या नागरिकांना चांगल्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. वादळ असल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये देखील पाऊस पडला आहे. पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

