मुंबई : लॉकडाऊनमुळे आधीच कोरोनाचं महासंकट असताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्यानं शेतकऱ्यांना यावेळी पेरणी वेळेत करता येणार आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 96 ते 100 टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. अवघा देश कोरोना सारखा महासंकटाचा सामना करत असताना दुसरीकडे हवामान विभागानं दिलासादायक बातमी दिली आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 या वर्षात मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या 100% असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे 5 किंवा -5% असा त्रुटी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरवर्षी मान्सून पहिल्यांदा केरळमध्ये येतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात. यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे 1 जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून 4 जून पंजाब 7 जून, हैदराबाद 8 जून, पुणे 10 आणि मुंबई 11 जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत 27 जूनला पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदलांमुळे यावेळी मान्सून दहा दिवस उशीरा निघेल असाही हवामान विभागाचा कयास आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

