नवी दिल्ली: सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती सर्वच जगाने घेतलेली दिसते. भारतासह अनेक देशांनी कोरोनासंबंधी निर्बंध कठोर केले आहेत. मात्र या निर्बंधामुळेच सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल होताना दिसतात. अशातच आता ब्रिटनमधील एका चिमुरडीने थेट पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका केली आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होताना दिसत हे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या चिमुरडीचा व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी म्हणते आहे की, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सर्वांना घरी राहण्याचं आव्हान केलं आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन स्वतः पार्टी मध्ये जातात. त्यामुळे त्यांनी सर्वांची माफी मागायला हवी. अशी मागणीही या चिमुरडीने केली आहे. नेमके या व्हिडिओमधील चिमुरडी कोण आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही, मात्र तिने थेट पंतप्रधान बोरिस जोन्सन यांच्यावर केलेली टीका यामुळे आता ती प्रकाशझोतात येत आहे.
ऐन लॉकडाउनमध्ये, आम्हाला घरात बसायला लावणारे पंतप्रधान बोरिस जॉन्सन स्वतः मात्र पार्टी करायला गेले ही या चिमुरडीची तक्रार आहे. pic.twitter.com/NSJWgfNtnR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 19, 2022
दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson ) यांनी बुधवारी देशात मास्क परिधान करण्यासह इतर निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. जॉन्सन म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आधीच उच्चांक गाठला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, आता कोविड निर्बंध उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, मास्कचा अनिवार्य वापर करण्याचा नियम सरकारने रद्द केला आहे. आता लोक मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतात. यासोबतच, लवकरच शालेय वर्गातही मास्क घालण्याच्या नियम हटवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- “शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी निती आमच्याच…”, योगेश कदमांचा गंभीर आरोप
- सोमवारपासून शाळा उघडणार? आज मंत्रीमंडळात निर्णयाची शक्यता
- “वैचारिक मतभेद असले तरी…”; राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी केले मनसेच्या उमेदवाराचे अभिनंदन
- रजनीकांतला वाचवायचे होते ऐश्वर्या-धनुषचे नाते, मात्र…
- अपहरण झालेला स्वर्णव नेमका सापडला कसा? वाचा सविस्तर


