Share

कोरोनाच्या सावटात दिलासादायक बातमी! लातूरच्या ‘या’ शाळेत झाला नविन शैक्षणिक वर्षाचा पहिला प्रवेश!

Published On: 

लातूर: गेल्या वर्षी पासून शाळा कोरोनाच्या या महामारीमुळे बंदच होत्या, काही ठिकाणी काही काळासाठी शाळा सुरु करण्यात आल्या होत्या मात्र या वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा सर्व विद्यार्थी घरूनच शाळा करू लागले. मात्र आता कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा कहर काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसत असून आता हळू हळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यातील खरोसा या गावात जिल्हा परिषद शाळेत या वर्षीचा पहिला प्रवेश झाला आहे.

खरोसा येथील जिल्हा परिषद शाळेतील यावर्षीचा पहिला प्रवेश झाला आहे. समर्थ भागवत राऊतराव असे या चिमुकल्याचे नाव आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी या चिमुकल्याचा सत्कार करून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. खरं तर जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवीन वह्या, पुस्तके, दफ्तर व गणवेश घेण्याचा, २ महिन्यांच्या सुट्टीनंतर वर्गमित्रांना पुन्हा भेटण्याचे मजेदार दिवस. पण कोरोनानं मागच्या वर्षीपासून ही मजा मुलांकडून हिसकावून घेतली आहे. यावर्षी तरी कोरोना पूर्णपणे आटोक्यात येऊन शाळा विद्यार्थ्यांनी फुलून जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांपासून शाळा दुरावली आहे. शाळा दुरावली तसेच मित्र देखील दुरावले. शाळेच्या मैदानावरचे खेळ आता घरात बसून खेळावे लागत आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी होत आहे त्यामुळे आता पुन्हा शाळेची घंटी लवकरच ऐकू येणार असे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!