नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तसेच लसीकरणावरही अधिकाधिक भर दिला जात आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असं म्हटलं आहे.
‘फक्त प्रत्येक देशवासी पर्यंत लस पोहचवा, मग हवं तर मन की बात पण सांगा!’ असं राहुल गांधी यांनी आज ट्विटद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले.
बस हर देशवासी तक वैक्सीन पहुँचा दो,
फिर चाहे मन की बात भी सुना दो!#VaccinateIndia pic.twitter.com/IIEgzyBK61— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 27, 2021
देशात सध्या करोना पाठोपाठ डेल्टा प्लस या नव्या आजारानेही डोकं वर काढलं आहे. तर, अनेक ठिकाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होताना दिसत नाही. देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. पंतप्रधान मोंदीनी देखील लसीकरण मोहीमेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन, लसीकरणास वेग देण्याच्या सूचना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने लसीकरणाला गती द्या’, मोदींनी घेतला आढावा
- मेनका गांधींबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, वाद निर्माण होण्याची शक्यता
- ‘यामुळे’ मला भुजबळांच्या बुद्धीची कीव येते; हरिभाऊ बागडेंची टीका
- सत्तांतरानंतरच्या हालचाली, जळगावात भाजपचे बंडखोर नगरसेवक गटनेता बदलण्याच्या तयारीत
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संजय राठोड यांचा ‘घर-अंगण चंदन’ उपक्रम


