नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमासंदर्भात समीक्षा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्स आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही उपस्थीत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी, आतापर्यंत टोचल्या गेलेल्या लशी, येणाऱ्या काळात लशींची उपलब्धता, राज्यांना लशींचा पुरवठा आणि लसीकरणाच्या कार्यक्रमासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि या मोहिमेला अधिकाधिक चालना देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ही मोहीम व्यापक करण्यासाठी त्यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि अन्य संघटनांना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.
‘कोरोना महासाथीविरोधात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा वेग यापुढेही कायम ठेवण्यात यावा. लसीकरणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एनजीओंचीदेखील मदत घेतली पाहिजे’ असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. देशातील १२८ जिल्ह्यांमधील ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, असं पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदनाद्वारे सांगण्यात आलं.
आपण राज्य सरकारांच्या संपर्कात असून निराळे प्रकार लागू करून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याबाबत प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी यासाठी एनजीओंची मदत घेण्याचाही सल्ला दिला. याशिवाय राज्यांच्या संपर्कात राहून चाचण्यांचं प्रमाण कमी होऊ नये याचीही काळजी घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- मेनका गांधींबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, वाद निर्माण होण्याची शक्यता
- ‘यामुळे’ मला भुजबळांच्या बुद्धीची कीव येते; हरिभाऊ बागडेंची टीका
- सत्तांतरानंतरच्या हालचाली, जळगावात भाजपचे बंडखोर नगरसेवक गटनेता बदलण्याच्या तयारीत
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संजय राठोड यांचा ‘घर-अंगण चंदन’ उपक्रम
- ‘संजय राऊत खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना’; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका


