Share

अंगणवाडी सेविका, शिक्षकांच्या माथी आणखीन एका कामाचा बोजा

Published On: 

औरंगाबाद : ग्रामीण भागामध्ये दिवसेदिवस वाढत असलेले कोरोना रुग्णांचे आकडे लक्षात घेता, जिल्हा परिषद अलर्ट झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. या कामात आरोग्य कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जाणार आहे.

शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरला आहे . त्यामुळे आतापर्यंत बाधित 210 गावांत सुपर स्प्रेडरचा शोध आणि तपासणी तसेच लसीकरण फोकस करण्याच्या सूचना ग्रामीण आरोग्य यंत्रणेला जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील मोठ्या प्रमानात कामाला लागला असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये अंगणवाडी सेविका तसेच शिक्षकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार असून गावात कोणाला ताप येतो का , कोणाला सर्दी, खोकला झाला का, आदी आजाराच्या बाबत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारीही प्रत्येक गावात जाऊन कोविड संदर्भात नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!