🕒 1 min read
मुंबई : देशात यंदा मान्सून हा वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यंदा मे महिन्यात एकामागे एक चक्रीवादळ देशात धडकल्यामुळे मान्सूनचं आगमन काही दिवसांनी पुढं जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यानुसार १ जून ला केरळात मान्सून दाखल होणे अपेक्षित होते, मात्र ३ जून ला मान्सून तिथे दाखल झाला.
दरम्यान, राज्यात मान्सून पूर्व पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली असून आता शेतकऱ्यांसह गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सून राज्यात कधी सक्रिय होणार याची उत्सुकता लागली आहे. आता केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाचे अधिकारी होसळीकर म्हणतात, सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्विप आणि केरळातील उर्वरित भागासह दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळाडूच्या; या भागांना व्यापलं आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल झाला आहे. दक्षिणेतील वाऱ्याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता. पण त्यानंतर आता मोसमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भागासह गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे.
GOOD NEWS for Maharashtra:
पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये वआणखी काही
भागांमध्ये जाण्याची शक्यता.
– IMD @CMOMaharashtra— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2021
यासोबतच, पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाला रोखण्यासाठी भटक्या मांजरी आणि कबुतरांना मारा ; कोरियाच्या हुकूमशहाने दिला अजब आदेश!
- बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; मनसेच्या आरोपानंतर उडाली खळबळ
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘काँग्रेसचे मंत्री लाचार झालेत, ते काका-पुतण्यांसमोर माना डोलावतात’
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
