Share

सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांकडे गोंदियावासियांचे लक्ष

Published On: 

गोंदिया : कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात सर्वत्र वेगाने होत आहे. पुर्वी थोड्याफार प्रमाणात शहरी भागात पोहोचलेल्या कोरोनाच्या संसर्गाचा शिरकाव आता ग्रामीण भागात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत मीना बोलत होते. यावेळी आमदार सहेषराम कोरोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी मीना पुढे म्हणाले, कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, बाधितांची गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणांनी रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये. त्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. बाधित रुग्णांची तक्रार येणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सर्व यंत्रणांनी आपसात योग्य समन्वय ठेवून काम करावे, जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होणार नाही.

तहसिलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना बाधित रुग्णांकडे वैयक्तीक लक्ष्य देवून काम करावे. रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यासाठी तहसिलदार यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. होम क्वारंटाईनमधील रुग्ण बाहेर फिरतांना दिसणार नाही याकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे. बाधित रुग्ण बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावे. बाधित रुग्णांना भोजन पुरवठा बाबतची माहिती जाणून घेतली. रुग्णांच्या जेवणाविषयी तक्रारी येणार नाही यासाठी रुग्णांना नास्ता व जेवण वेळेवर देण्यात यावे. तहसिलदार यांनी बाधित रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे मनोधैर्य वाढवावे. दवाखान्यात दररोज साफसफाई होते की नाही याकडे विशेष लक्ष दयावे. तसेच परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी देवरी उपविभागीय अधिकारी राठोड यांनी आमगाव व सालेकसा तालुक्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचे सादरीकरण करून विस्तृत माहिती दिली. ‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेअंतर्गत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने सर्व कुटूंबाचे सर्व्हे करायचे आहे. सर्व्हे करण्यास काही अडचणी येत असतील तर यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. एका दिवसात 50 घराचे सर्व्हे करायचे आहे. यासाठी यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे. सर्व्हे करण्याचे काम 15 दिवसात पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना मीना यांनी संबंधितांना दिल्या.

‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात यावी. घरोघरी जावून माहिती संकलीत करावी. प्रत्येक 50 घरामध्ये एक पथक तयार करण्यात यावे. कोरोनाबाबत रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरुन रुग्णांमध्ये भीती निर्माण होणार नाही. रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करावा व सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन मीना यांनी यावेळी केले. आमदार श्री कोरोटे म्हणाले, सालेकसा तालुक्यातील प्रत्येक गावात जावून फवारणी करण्यात यावी. नाहीतर मलेरीया होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!