चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील कोलगाव ते विसापुर या प्रमुख जिल्हा मार्गावर वर्धा नदीवर मोठया बुडीत पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजुर झाले असून, यासाठी 56 कोटी 56 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
बल्लारपुर तालुक्यातील कोलगाव ते विसापुर या प्रमुख जिल्हा मार्ग 113 वर वर्धा नदीवर मोठया बुडीत पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजुर व्हावे, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. या पाठपुराव्याच्या फलस्वरुप सदर पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेतून 2019-20 यावर्षात मंजुर करण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 56 कोटी लाखाचा निधी मंजुर झाला आहे.
हा मोठा पुल कोलगाव नांदगांव, सास्ती व विसापुर या प्रमुख गावांना जोडत असून, यामुळे सास्ती मार्गे जाणाऱ्या वाहतुकीस दिलासा मिळेल. हे अंतर 10 किमी ने कमी होणार आहे. या पुलामुळे कोलगांव, सास्ती, नांदगांव व विसापुर येथील अंदाजे 24 हजार नागरिकांना फायदा होणार आहे.
या मोठया पुलाची लांबी 360 मीटर असून, पुलाच्या दोन्ही बाजुचे पोचमार्ग 3.50 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याद्वारे जोडण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुलाचे बांधकाम दोन महिन्यात सुरु होईल.
तसेच दोन वर्षाच्या कालावधीत पुलाचे बांधकाम पुर्ण करण्याचे नियोजित आहे. या पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत 56 कोटीचा निधी मंजुर केल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते – बाळासाहेब थोरात
- मोठी बातमी : प्रचंड गोंधळात राज्यसभेत कृषि विधेयके मंजूर
- कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नगर-मनमाड रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
- विजय वडेट्टीवारांची जन्मभुमी बेपत्ता, हरवली गावाची पाटी
- मोठी बातमी : प्रचंड गोंधळात राज्यसभेत कृषि विधेयके मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

