🕒 1 min read
कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. यांनतर, काही दिवसांपूर्वी गोकुळच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
२ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी महाडिक-पी.एन पाटील गटाविरुद्ध शाहू विकास आघाडी असा सामना रंगणार असल्याने चुरस वाढली आहे. गेले वर्षभर लांबलेली निवडणूक २ मे रोजी होणार असतानाच पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा हाहाकार वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक रद्द करण्याची मागणी होते आहे.
यासंदर्भात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली असून यावर आज सुनावणी होणार आहे. गोकुळचे काही ठरावदार पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा आटोक्यात असला तरी या निवडणुकांमुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत करण्यात आली अँजिओप्लास्टी
- ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- देशात युद्धजन्य परिस्थिती, जनतेत संभ्रम आणि तणाव; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी
- देशात लसींचा तुटवडा नाहीच; अमित शाह यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

