Share

दैव बलवत्तर! पुणे-सातारा हायवेवर ‘बर्निंग बस’मधील १५ प्रवासी सुखरुप

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे- सातारा महामार्गावर आज एक भीषण घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर शिंदेवाडीच्या हद्दीत एका ट्रॅव्हलर मिनीबसने अचानक पेट घेतला. या पेटलेल्या बसमध्ये १५ प्रवासी होते. आग लागलेल्या बसमधून ताबडतोब सर्व प्रवासी बाहेर निघाल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र या आगीत बस जळून खाक झाली.

ही मिनीबस पुणे सातारा महामार्गावरुन सव्वा सहाच्या सुमारास पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. कात्रज बोगद्यातून बस पुढे आल्यानंतर अचानक इंजिनमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले आणि गाडीने पेट घेतला. अचानक गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बसमधून सुखरुप बाहेर पडले. त्या ठिकाणी असलेले वेल्हे तालुक्यातील भाऊ दसवडकर व बाळासाहेब माने या दोघांनी प्रवाशांना दिलासा दिला व चालकास शांत केले. ‘माझे मरण पाहिले म्या डोळा’ अशी भावना या संकटातून बचावलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली होती. दरम्यान या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आली आणि त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!