नवी दिल्ली – एका बाजूला कर्नाटकात कॉंग्रेस सत्ता गमावणार अशी चिन्हे दिसत असताना तिकडे गोव्यात मात्र कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत(बाबू) कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा आमदार पक्षत्याग करून भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
दरम्यान,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून बुधवारी भाजपात आलेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज गुरुवारी (11 जुलै) दुपार पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत.
परराज्यात गेलेल्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा गोव्यात परतल्या असून नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे . शहाआणि जे. पी. नड्डा यांची भेट घेवून ही मंडळी आज गोव्यात परततील आणि मग सायंकाळीच चार आमदारांचा शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

