Share

तेजपाल निकालाविरोधात गोवा सरकार कोर्टात जाणार-मुख्यमंत्री सावंत

Published On: 

पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणातील ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांची म्हापसा न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी मुक्तता केली. तेजपाल याची मुलगी तारा हिने निकालाचे स्वागत केले. या निकालाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात दाद मागणार आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

हा निकाल १९ मे रोजी जाहीर होणार होता. मात्र, कोर्टात वीजपुरवठ्याची समस्या असल्याने सुनावणी २१ मेपर्यंत तहकूब करण्यात आली. याआधी म्हापसा कोर्टात युक्तिवाद पूर्ण झाले होते. त्यावर २७ एप्रिलला निकाल होईल, असे सांगण्यात आले. परंतु, ती सुनावणी तहकूब करून १२ मे ही तारीख देण्यात आली. पण कोविडमुळे न्यायालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देऊन त्या दिवशी ती सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली होती.

काय आहे प्रकरण?
७ – ८ नोव्हेंबर २०१३ : उत्तर गोवा स्थित एका हॉटेलात ‘तहलका’कडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तरुण तेजपाल यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका सहकारी महिलेकडून करण्यात आला

२२ नोव्हेंबर २०१३ : गोवा पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तरुण तेजपालविरुद्ध एफआयआर दाखल केली.

३० नोव्हेबंर २०१३ : तेजपाल २८ नोव्हेंबर रोजी गोव्याला परतले. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली.

१९ मे २०१४ : आईच्या अंत्यसंस्कारसाठी तरुण तेजपाल यांना जामीन देण्यात आला तेव्हापासून ते बाहेर आहेत. जुलै २०१४ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

सप्टेंबर २०१७ : म्हापुसा कोर्टानं तेजपाल यांच्या विरोधात कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिला सहकाऱ्याचा लैंगिक शोषण प्रकरणात आरोप निश्चित केले. तेजपाल यांच्याकडून निर्दोष असल्याचा दावा करण्यात आला.

२१ ऑक्टोबर २०१९ : पीडितेची चौकशी सुरू झाली. तेजपाल यांच्याकडून निश्चित करण्यात आलेल्या आरोपांन आव्हान देण्यात आलं

२० डिसेंबर २०१९ : गोव्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं तेजपाल यांची याचिका फेटाळली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!