पणजी: गोव्यातील विधानसभेच्या निवडणुका (Goa Elections) आता तोंडावर आल्या आहेत. मात्र निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गोव्यातील निवडणुका चांगल्याच रंगणार असल्याचे चित्र आता पासूनच बघायला मिळत आहे. त्याच सोबत शिवसेनेला देखील गोव्यातील कॉंग्रेस साथ देत नसल्याचे चित्र दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्तव्यं केले आहे. गोव्यात शिवसेनेचे लढाई ही नोटासोबत असते. त्यांची लढाई ही अनामत एका जागेवर तरी रक्कम वाचवण्यासाठी असते. मला वाटत नाही की ते काही करु शकतील, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस कॉंग्रेस बद्दल बोलताना म्हणाले, काँग्रेस खूप हुशार पक्ष आहे. ते इथे सगळ्यांना सोबत घेतील पण शिवसेनेला सोबत घेणार नाही. महाराष्ट्रात ते शिवसेनेसोबत असतील पण त्यांना हे माहिती आहे की गोव्यात शिवसेनेला सोबत घेतल्यास आपल्या मायनॉरिटी बेसला धक्का बसेल. त्यामुळे ते शिवसेनेला सोबत घेणार नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आता महाराष्ट्रातही रंगणार ऑलिंपिक स्पर्धा; ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात
- ‘मलिकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज’; अतुल भातखळकरांची टीका
- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली
- राज्यातील शाळा बंदला शिक्षण तज्ञाचा विरोध, म्हणाले तर तेव्हा मुंबईच्या शाळा…
- ‘ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टीका करू नये’; शिवसेनेच्या आमदाराला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

