मुंबई: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे (Maharashtra Olympic Association) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) मंत्रालयातील त्यांच्या दालनातून ऑनलाईन सहभागी झाले होते. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्यात ऑलिंपिक स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, २०२४, २०२८, २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात लवकर तयार करुन राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाशी आपण सामना करत आहोत. या कोविड संकटामुळे खेळाडूंचे मनोबल खचू नये, यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने काम केले पाहिजे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव या बैठकीत झाला आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदके जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मलिकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज’; अतुल भातखळकरांची टीका
- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली
- राज्यातील शाळा बंदला शिक्षण तज्ञाचा विरोध, म्हणाले तर तेव्हा मुंबईच्या शाळा…
- ‘ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टीका करू नये’; शिवसेनेच्या आमदाराला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
- अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर कोरोना पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

