मुंबई: ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह, कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण, तसेच मोदींचे पीएमओ मधील सचिव ए.के. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादीचे नेते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत या एजन्सीमध्ये काम करणारे ते भाजपचे कार्यकर्ते होते. अशा पद्धतीने अजून बरीच कामे आहेत. या भाजप कार्यकर्त्यांबद्दल विरोधी पक्ष जे बोलत होते ते आता खरे ठरू लागले आहे, अशी टीका केली होती.
राष्ट्रवादी नेते नवाब मालिक (Nawab Malik) यांनी केलेल्या त्या टिकेनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.
अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) नवाब मलिक यांच्यावर टीका करताना म्हणाले, आधी तुमच्या घरात काय सुरूय ते बघा आणि मग इतर ठिकाणी लक्ष घाला, तुमचे आमदार काय करत आहेत ते आधी बघा आणि मग भाजपवर बोलण्यासाठी तोंड उघडा, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. गेल्या काही दिवासांपासून एनसीबी आणि ईडीवरून नवाब मलिक यांनी सतत भजापवर टीका करत आहेत. यावर भाजप नेत्यांनी देखील वेळोवेळी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली
- राज्यातील शाळा बंदला शिक्षण तज्ञाचा विरोध, म्हणाले तर तेव्हा मुंबईच्या शाळा…
- ‘ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टीका करू नये’; शिवसेनेच्या आमदाराला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
- अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर कोरोना पॉझिटिव्ह
- उत्तर प्रदेशात भाजपला धक्का; तीन आमदारांनी सोडला पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

