Share

‘ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टीका करू नये’; शिवसेनेच्या आमदाराला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

सातारा: रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी दूर व्हावं असं वक्तव्य शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. महेश शिंदे यांच्या वक्तव्यावर व त्यांनी केलेल्या काही आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकारांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्था अनेक वर्षे उत्तमरित्या सांभाळली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांना मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलं आहे. विविध क्षेत्रातील जाणकार या संस्थेचे संचालक असून महाराष्ट्रभरात विखुरलेल्या या संस्थेचं काम उत्तमपणे पाहत आहेत. करोना काळात पवार साहेबांनी संस्थेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून संस्थेचं काम थांबू दिलं नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल आणि पवार साहेबांबद्दल माहिती नाही, त्यांनी अशी टीका करू नये. पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा विषय आत्ताच का निघाला? या सर्वांच्या पाठीमागे कोण आहे हे बघितलं गेलं पाहिजे, असंही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!