🕒 1 min read
मुंबई: राज्यात कोरोनाचा (Corona) पुन्हा एकदा उद्रेक होताना दिसत आहे. राजधानी मुंबई तसेच पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना सोबतच ओमायक्रॉनचे देखील रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मुंबई पुण्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत त्याच सोबत राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
राज्यातील शाळा बंद (Schools Closed) करण्याचे राज्य सरकारच्या निर्णयाला मात्र अॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे राज्य संयोजक व शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी विरोध दर्शवला आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होऊ लागलाय. ऑनलाईन शिक्षणामुळं गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. कारण अनेक विषय ऑनलाईन पद्धतीनं समजून घेता येत नाहीत. यामुळं शाळा ऑनलाईन न ठेवता ऑफलाईन पद्धतीनं सुरू ठेवणअयाची मागणी विद्यार्थी करीत आहेत.
विद्यार्थी व पालक ऑफलाईन शिक्षणासाठी आग्रही असून अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा सरसकट शाळा बंदचा निर्णय चुकीचा असल्याच स्पष्ट केलं आहे. तसेच भाऊसाहेब चासकर (Bhausaheb Chaskar) या निर्णयाचा विरोध करताना म्हणाले, नंदुरबार, गडचिरोली भागात जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता तर सरकारनं पुणे, मुंबईच्या शाळा बंद केल्या असत्या का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टीका करू नये’; शिवसेनेच्या आमदाराला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
- अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर कोरोना पॉझिटिव्ह
- उत्तर प्रदेशात भाजपला धक्का; तीन आमदारांनी सोडला पक्ष
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया
- ‘मुख्यमंत्रीच प्रत्येक निर्णय घेतात’; भाजपच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
