Share

Goa Assembly Election 2022 : गोव्यात आज होणार आदित्य ठाकरेंची सभा

Published On: 

गोवा: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( State Environment Minister Aditya Thackeray)यांची आज गोव्यात सभा होणार आहे. तसेच उद्या त्यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान गोव्यातील प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगळे असल्यामुळे आम्ही वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून काही वेळातच सभा सुरु होणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे. (Aditya Thackeray meeting to be held in Goa today) दरम्यान आदित्य ठाकरे आज वास्कोत सभा घेतील. मग पेडण्यात जातील.तसेच उद्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ साखळीत त्यांची सभा असून म्हापसामध्येही ते सभा घेणार आहेत.

दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्यात प्रचार सभा घेतली. आता आज आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. त्यामुळे गोव्यातील राजकीय हालचाली घडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या भाषणाने भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, गोव्यात भाजपला २२ पैकी २२ जागा मिळणार असलायचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!