Share

Shivsena | शिंदे गटाला मोठा धक्का! न्यायालयाने शिवसेनेला ‘शिवतिर्थ’वर दसरा मेळाव्याची दिली परवानगी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही, याचा निकाल लांबणीवर पडला होता. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आज पार पडली. शिवसेनेच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं होत. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुरवातीला शिंदे गटाकडून दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली. यानंतर न्यायालय ठाकरे गटाच्या याचिकेवरील निकालाचं वाचन केलं. शिवसेनेला कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळतानाच कोर्टाने मुंबई महापालिकेचं म्हणणंही खोडून काढलं आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे. या मेळाव्यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!