🕒 1 min read
अहमदाबाद : अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये साउथम्प्टन होणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात पंतव्यतिरिक्त केएल राहुल हादेखील यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या दोघात तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटीत ताबडतोब खेळी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु राहुलही टी२० स्वरुपात भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू आहे. तो आयसीसीच्या टी२० क्रमवारीतही टॉप-५ मध्ये आहे.
दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात फॉर्मात असलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला संधी दिली पाहिजे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणला वाटते. भारताने यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी झालेल्या टी-२० मालिकेसाठी पंतला संघातून वगळण्यात आले होते. परंतु, त्याने मागील काही कसोटी सामन्यांत दमदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत दोन मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला सलामीच्या सामन्यात संधी मिळाली पाहिजे, असे मत लक्ष्मणने व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

