अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे.
या मालिकेत भारतीय संघव्यवस्थापनासमोर अंतिम अकरामध्ये कोणत्या क्रिकेटपटूंना संधी द्यायची, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. प्रत्येक स्थानासाठी टीम इंडियामध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. सलामीवीर, चौथा क्रमांक, यष्टिरक्षक व गोलंदाजी या चार विभागांत कोणत्या खेळाडूंना अंतिम अकरामध्ये चान्स देण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे. फलंदाजी विभागात लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव आणि गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांच्यात रस्सीखेच लागताना दिसणार आहे.
रिषभ पंतने कोरोनानंतरच्या काळात जबरदस्त फलंदाजी करीत कसोटीप्रमाणे झटपट क्रिकेट मालिकांसाठी टीम इंडियाच्या संघात कमबॅक केले आहे. पण यामुळे समीकरणे बदलली आहेत. लोकेश राहुल यष्टिरक्षक व फलंदाज अशा दोन्ही भूमिका बजावत असे. मात्र आता रिषभ पंतचा संघातील समावेश पक्का आहे. त्याच्या खांद्यावर यष्टिरक्षकासोबतच प्रमुख फलंदाजांचीही जबाबदारी असेल. त्यामुळे लोकेश राहुलकडे सलामीवीराची भूमिका सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

