Share

औरंगाबादेत आजपासून अंशत: लॉकडाऊन; रात्री ९ पर्यंतच दुकाने सुरू राहणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यात आजपासून ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रात्री ९ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर शनिवार- रविवारी शंभर टक्के लॉकडाऊन असणार आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, मास्क न घालणाऱ्या दुकानदाराचे दुकान सील करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, व्यायामशाळा, जिमही बंद
> शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद. ऑनलाइन शिकवण्यांचा पर्याय सुरू.
> मंगल कार्यालयात सोहळ्यांना मनाई. रजिस्टर मॅरेजचा पर्याय खुला राहील.
> सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलने, आठवडी बाजार, स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद.
>जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा, जिम ११ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान बंद राहतील.
>हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, इतर दुकाने रात्री नऊपर्यंत खुली. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा मात्र देता येईल.
> शनिवार- रविवारी दिवसभर बंद.

काय सुरु राहणार
वैद्यकीय सेवा, वृतपत्र, भाजीपाला विक्री, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, सर्व वाहतूक, बँक कारखाने सुरु राहणार, दुकाने सुरु राहणार, चिकन मटण दुकाने सुरु राहतील.

कारखाने सुरू राहणार, कामगारांना चाचणी सक्तीची
लॉकडाउन काळात कारखान्यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे ते सुरूच राहतील. मात्र कामगारांना आरटीपीसीआर तपासणी करून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र व स्वतःचे ओळखपत्र जवळ बाळगावे लागेल. शिवाय दर १५ दिवसांनी पुन्हा चाचणी करून घ्यावी लागेल. आरोग्य विभागाने तशा सूचना कंपन्यांना दिल्या आहेत.

जाधववाडीत बाजार समिती बंदच राहणार
११ ते १७ मार्चदरम्यान जाधववाडी बाजार समितीतील भाजी-फळांचा घाऊक बाजार बंदच राहणार आहे. येथील धान्य, कडधान्य, खते, बियाणे व किराणा दुकाने मात्र सुरू राहतील.

दुचाकीवर विनामास्क फिरणाऱ्यांचे लायसन्स जप्त
दुचाकीवरून ट्रिपल सीट व विनामास्क फिरणाऱ्यांचे लायसन्स जप्त केले जातील. यासाठी आरटीओ, महसूल, पोलिसांना अधिकार दिले आहेत. प्रवासी वाहतूक करणारेही विनामास्क दिसल्यास त्यांचेही लायसन्स जप्त होईल. बस, रिक्षांमध्ये विनामास्क, जास्तीचे प्रवासी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!