🕒 1 min read
कोलकाता : काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करण्याचं आवाहन करुन देखील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, छत्तीसगड आणि केरळ राज्यांनी कर कमी न केल्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला होता. भाजपशासीत राज्यांनी तोटा सहन करुन जनतेला दिलासा दिला होता. पण या राज्यांनी आता तरी देशहिताचा विचार करुन कर कमी करावेत, असे आवाहन मोदींनी केलं होतं. या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झाले आहेत.
“आम्ही गेल्या ३ वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपासून जनतेला दिलासा मिळावा म्हणून १५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. आमचे केंद्राकडे प्रलंबित असलेले ९७ हजार कोटी आम्हाला द्या पुढली पाच वर्ष पेट्रोल आणि डिझेलवर कर लावणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली माहिती चुकीची होती. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलवर अनुदान देत आहोत. त्यासाठी आम्ही १५०० कोटी खर्च केले आहेत. नरेंद्र मोदी राज्यांना कर कमी करायला लावत आहेत, मात्र आमचे केंद्रांकडे प्रलंबित असलेले ९७ हजार कोटी द्यावेत. असे बोलत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे.
It is our promise that if the Central Government clears our dues, Government of West Bengal will exempt all taxes from Petrol & Diesel for the next 5 years!
₹97,807.91 Cr is due. @narendramodi ji, let's see if you can deliver.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 27, 2022
“तृणमूल काँग्रेस पक्षाच्यावतीनं केंद्र सरकारनं आमचे ९७ हजार ८०७.९१ कोटी रुपये द्यावेत, आम्ही पुढील पाच वर्ष पेट्रोल आणि डिझेलवरील सगळे कर रद्द करु असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारनं २०१४ पासून १७ लाख ३१ हजार २४२ कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा केला आहे. तुम्ही राज्य सरकारांना कर कपात करण्यासाठी सांगता तेव्हा ही बाब लोकांना का सांगत नाही? असा सवाल देखील ममता बॅनर्जींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
