Share

पंतप्रधान मोदींच्या बैठकीवरुन संजय राऊतांची टीका; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२७ एप्रिल) कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या, असेही राऊत म्हणाले.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘पंतप्रधान मोदी कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करणार होते. परंतु, कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या’, असे राऊत म्हणाले. तसेच लवकरच मुंबईत शिवसेनेची सभा होणार असल्याची माहितीही यावेळी राऊत यांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना चोख उत्तर दिले होते. मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा, तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कराचा वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे, असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असे ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!