🕒 1 min read
मुंबई : मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर एसटी आंदोलनानंतर बँक घोट्याळ्याचा आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, असे ते म्हणाले.
तसेच एसटी बँकेची निवडणूक घोषीत केली आहे आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढला आहे आणि जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.
पुढे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला. म्हणाले, “1995 ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली 500 रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम गोळा केली. अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास 100 कोटी रूपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना 20-20 लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या”.
मागील सहा महिन्यापासून #एसटी_कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण शकुनी काकांनी आता याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक गिळंकृत करण्याचा डाव आखलाय.अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत.@BJP4Maharashtra @msrtcofficial pic.twitter.com/TffQCJQnFr
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) April 28, 2022
तसेच ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होता. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही. जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत. असेही पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
