Share

‘शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या’, महिलांचे न्यायालय परिसरात निदर्शने

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात धारणी न्यायालयात आणण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर शेकडो महिलांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी यावेळी संतप्त महिलांनी केली. महिला आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवकुमारला धारणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात धारणी न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. लोकांमध्ये असलेला संताप व असंतोष पाहता न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयाबाहेर आरोपी विनोद शिवकुमारला फाशी देण्याची मागणी करत त्याचे छायाचित्र जाळण्यात आले. निदर्शने करण्यात आली.

दरम्यान दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांच्यावर मोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करुन श्रद्धांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!