लातूर : कोवीड १९ / करोना विषणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालीकेने शहरात लॉकडाऊन संबंधिच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे, प्रभागनिहाय भाजीपाला व फळे विक्रीसाठी रेशन दुकान किंवा अन्य दुकाना समोर जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालीका प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत.
कोवीड १९ संदर्भाने वाढलेल्या लॉकडाऊनच्या पाश्वभुमिवर पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे लातूर महापालीकेचे पदाधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत लातूर शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्याचा आढावा घेतला.
या बैठकीत महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा विरोधी पक्षनेते दिपक सुळ, अतिरीक्त पोलीस अधिक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, महापालीकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या कालावधीत लातूर शहरातील रस्त्यावर होत असलेली अनावश्यक गदी्र कमी करावी, अनावश्यक वाहनांना प्रतिबंध करावा, नागरिकांनी जवळच्या दुकानातुनच जीवनावश्यक वस्तुची खरेदी करावी अशा सुचना त्यांना दयाव्यत, शहरामध्ये अनावश्यक फिरणारे भाजीपाल व फळाचे गाडे बंद करून या वस्तु मिळण्यासाठी रेशन दुकान किवा अन्य दुकाना समोर जागा निश्चीत करून दयावयात, यासाठी प्रभागनिहाय पालक अधिकारी नेमावेत, अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या.
प्रभागनिहाय फलुक्लिनीकची उभारणी करावी
लातूर शहरात सदया एकही कोवीड १९ रूग्ण नाही ही समाधानाची बाब असली तरी आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत असा रूग्ण शहरात आढळणार नाही यासाठी आणखी कडक उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत त्यासाठी शहराच्या हददीवर नाकेबंदी करण्यात यावी, मनपा व पोलीस अधिकाऱ्यांनी सक्तीची तपासणी करूनच लोकांना शहरात प्रवेश दयावा. प्रभागनिहाय स्थाननिश्चीत करून फलुक्लिनीची उभारणी करावी, शहरातील मनपा कर्मचाऱ्यांना बॅचेस उपलब्ध करून दयावेत.
गरजूना नवीन रेशनकार्ड देण्याची मोहिम राबवावी
शहरात कोणी गरजू नागरीक रेशन मिळण्यापासून वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी, जे नागरिक पात्र आहेत पण त्याच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना रेशनकार्ड काडून देण्याची मोहिम राबवावी. त्यासाठी प्रारंभी एका प्रभागाची निवड करावी. शालेख पोषण आहाराचे नियमित वाटप व्हावे आदी सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी केल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

