Share

‘मोदींच्या अभिनयाला ऑस्कर्स पुरस्कार द्या’ ; राम गोपाल वर्मा यांचे ट्विट चर्चेत

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका देखील फुटला.

मात्र, यानंतर आता सर्वांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियावर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर ऑस्कर्स हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. त्यांना ऑस्कर्स पुरस्कार द्या अशी टीका अनेकांनी केल्यामुळे OSCAR हा शब्द ट्रेण्डमध्ये आहे. शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या या ट्रेण्डमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपालवर्मा यांनीही ट्विट केलं आहे.

राम गोपाल वर्मा याचे ट्विट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये यांनी ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे एडीट करुन तयार केलेला छोटा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पुरस्कार देणारी महिला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन आहेत. असं म्हणते आणि त्यानंतर मोदींच्या संवादामधील रडण्याची क्लिप व्हिडीओत लावण्यात आली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदी म्हणाले कि, ‘मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो’ असे म्हणताना देखील त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!