Share

एका मिसकॉल वर चेक करा जनधनखात्याचे पैसे…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे रोजगार बंद आहेत. लोकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारने जनधन खातेधारक महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांसाठी दर महा ५०० रुपये देण्याची घोषणा केली. ते पैसे आपल्या खात्यात आले की नाही हे चेक करण्यासाठी महिला बँकेत गर्दी करत आहेत. मात्र अशा पद्धतिने गर्दी होणे चुकीचे असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांसाठी एका मिसकॉलवर बॅलन्स चेक करण्याची सुविधा सुरु केली आहे.

कोणताही जनधन खातेधारक या 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर कॉल करुन आपल्या खात्यातील बॅलेन्स काही क्षणात चेक करु शकतो. खातेधारकाला आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरवरुन या क्रमांकावर कॉल करावा लागेल. खातेधारक या सुविधेद्वारे एका वेळी पाच ट्रान्झक्शनबाबत माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर खातेधारक आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरवरुन 9223766666 या क्रमांकावरही कॉल करु शकतो. या क्रमांकावर कॉल करुन खातेधारकाला संपूर्ण माहिती मिळू शकते.

जनधन खातेधारक आहात परंतु तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड नसेल तर 09223488888 या क्रमांकावर मेसेज करुन आपण मोबाईल नंबर रजिस्टर्ड करु शकतो. मेसेज करण्यासाठी खातेधारकाला REG (AccountNumber)लिहून 09223488888 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल. त्यानंतर आपण देखील याचा लाभ घेऊ शकाल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!