Share

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची तात्काळ मदत द्या, भाजपची मागणी

Published On: 

लातूर : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा, तेरणा भागातील शेतकऱ्यांची शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. याच काळात मांजरा व तेरणा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे दोन्ही नद्यांना महापूर आला असून नदीकाठची शेती पुरता पाण्याखाली गेली आहे. देवणी तालुक्यात लासोना, बटनपूर, सिंधीकामठ भागात मांजरा व तेरणा नदी संयुक्तपणे वाहत असल्यामुळे नदीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे नदीकाठचा परिसर जलमय झालेला आहे. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असताना महाराष्ट्र शासन व पालकमंत्री मात्र, लातूर जिल्ह्याच्या जनतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ एकरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेले सोयाबीनचे नगदी पीक मातीमोल झाले आहे. अशा संकटप्रसंगी शेतकऱ्यांना सरसकट मदत न करता पंचनाम्याचे नाटक केले जात आहे. विमा कंपनीचे प्रतिनिधी योग्य तो प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे जनता नैसर्गिक संकटाबरोबर शासन रुपी संकटात अडकलेली आहे. अशा अडचणीत सापडलेल्या जनतेला भेट देऊन सांत्वन करून धीर देऊन शासनाच्या व विमा कंपनीच्या माध्यमातून तात्काळ सरसकट अनुदान व विमा मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करायची असेल, संकटातून बाहेर काढायचे असेल तर लातूर जिल्हा तात्काळ ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करून युद्धपातळीवर मदत करावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देवणी तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या गावांचा लासोना, बटनपूर सिंधिकामठ येथील शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!