Share

‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊनच विधानसभा निवडणुका घ्या’

Published On: 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन त्यानंतरच राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याची आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. जम्मू-काश्मीरमधील सुमारे १४ राजकीय पक्षांची बैठक केंद्र सरकारने येत्या गुरुवारी बोलवली असतानाच काँग्रेसने राज्याला पूर्ण राज्य बनवण्याचा सूर आळवला आहे. पण केंद्र सरकार सोबतच्या बैठकीत सामील होण्याविषयी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सध्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे व तेथे निवडणूक घेणे हाच लोकशाही प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला. त्यानंतर ६ ऑगस्ट २०१९ रोजी ‘काँग्रेस कार्य समिती’ने (सीडब्लूसी) एक प्रस्ताव पारित केला. त्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. आता काँग्रेसने त्याचा पुनरुच्चार केला.

काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवणे हा लोकशाही व घटनात्मक सिद्धांतावर केलेला हल्ला आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काश्मीरला पूर्ण राज्य बनवणे व त्यानंतरच तेथे विधानसभा निवडणूक घ्यावी, तरच स्थानिक जनता आपले योग्य प्रतिनिधी निवडू शकेल. काश्मिरी जनतेला पूर्णपणे लोकशाहीचे अधिकार देण्याचा हाच एकमेव पर्याय आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!