🕒 1 min read
इस्लामाबाद : जागतीक क्रिकेट मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. काही दिवसापुर्वी पाकिस्तानच्या जुनेद खान या क्रिकेटपटुने संघात भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता. कर्णधाराच्या मर्जीतल्या खेळाडूंना संघात स्थान मिळते असा अरोप जुनेदने केला होता.
या आरोपानंतर जुनेदला वाटले की त्याला संघात पुन्हा स्थान मिळेल ही आशा होती. मात्र इथेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला संधी न देता एका अशा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली जो निवृत्तीच्या मार्गावर आहे. झिम्बाब्वे विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात ताशीब खान नावाच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाची संधी दिली. महत्वाची बाब म्हणजे ताशीब खानने २००२ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Tabish Khan is making his Test debut today for Pakistan!#ZIMvPAK | #HarHaalMainCricket | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/HfwrqzdM3K
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 7, 2021
तब्बल १९ वर्षे प्रतिक्षा केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ताशीबने कामगीरीत सातत्य दाखवत ५९८ गडी बाद केले आहे. पण ताशीब खान हा पाकिस्तानचा पहिला खेळाडू नाही ज्याला इतक्या उशीरा संधी देण्याचा पराक्रम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. याआधी पाकिस्तानने १९५५ साली मिरान बख्शला ४७व्या वर्षी तर १९५२ साली आमिर इलाहीला ४४व्या वर्षी पदार्पण करण्याची संधी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
- अभिनेत्री कंगनाला कोरोनाची लागण ; सोशल मिडियावरून स्वतः दिली माहिती
- मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करत आलिया भट्टने मेन्टल हेल्थ सेंटरची दिली माहिती
- चिंताजनक : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ
- ….तर भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन न केलेले बरे: पॅट कमिन्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
