Share

वैजापुरात गॅसच्या स्फोटात डोळ्यासमोर घर बेचिराग!

Published On: 

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील निमगाव येथे गॅसचा स्फोट होऊन घर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सोने दागिन्यांसह रोख रक्कम ४० हजार रुपये जळून खाक होऊन अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी असलेले येडूबा गायकवाड, पत्नी चंद्रकलाबाई गायकवाड हे दोघे पती पत्नी सध्या खरज शिवारातील शेतवस्तीवर राहतात. सोमवारी (दि.५) रात्री साडेआठ वाजता चंद्रकलाबाई गायकवाड स्वयंपाक पाणी आवरुन करून शेजारी मुलांकडे बसण्याकरीता गेल्या होत्या.

रात्री पावणेदहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील संसार उपयोगी साहित्यासह घराच्या छताचा पत्रा हजार बाराशे फुट जाऊन पडले. या स्फोटात एक शेळी जागेवर ठार झाली व बँकेतून ४० हजार काढून आणलेली रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने जळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात जीवित हानी टळली. यामध्ये चंद्रकलाबाई येडुबा गायकवाड यांचा चेहरा भाजल्याने त्यांना औरंगाबाद घाटीत हलविण्यात आले आहे. त्या २० ते २५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!