Share

वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या दोन ट्रॅक्टर सेलूमध्ये पोलिसांनी केले जप्त

Published On: 

परभणी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी वाळूची अवैध वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे.  या कारवाईत सहा लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सेलू शहरात वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रेकर, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळेसह आदींच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सेलू शहरातून वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला थांबवले.
चालकाकडे वाळूबाबत विचारणा केली. मात्र, त्याच्याकडे कुठलीही पावती आढळली नाही. अवैध वाळू उपसा करीत चोरट्या पद्धतीने ती वाळू विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने दोन ट्रॅक्टर जप्त करुन दोघांना पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोघांना ताब्यात घेत सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!