लातूर: राज्यसह जिल्हयात कोरोना पादूर्भाव वाढताना दिसत आहे. हा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आपल्या जबाबदाऱ्या विभागून घेऊन अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत व्हावे कोणत्याही परिस्थितीत रूग्णसंख्या वाढणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेवून मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना आखून त्यावरील अंमलबजावनीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज रोजी सकाळी व्हिडीओ कॉन्फगसिंगव्दारे जिल्हयातील सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकाऱी यांची आढावा बैठक घेवून संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हयात रुग्ण्संख्या वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, पोलीस यंत्रणांनी सक्ती करू नये, रेमडेसीवीरची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रारंभी या बैठकीत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडून जिल्हयातील एकूण कोरोना प्रादूर्भावाची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवीण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावनी करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षी एवढी रूग्णसंख्या वाढू नये याची दक्षता जिल्हयातील सर्व यंत्रणांनी मिळून घ्यावयाची आहे असे निर्देश त्यांनी दिले.
- ‘अब्दूल सत्तारांवर आता कारवाई करणार का?’, खा.जलील यांचा सवाल
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- गंभीर कोरोनाबाधितांसाठी मनपाने मागवले दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन
- राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट
- व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं, शिवेंद्रराजे कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

