औरंगाबाद : सध्या दररोज दिड हजारांहून अधिक रुग्ण निघत आहेत. शहरातील ८ भाग मोठे हॉटस्पॉट ठरले आहेत. शासन निर्देशानुसार सौम्य लक्षणे असलेल्या बहुतांश रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये घरीच उपचार दिले जात आहे. आजघडीला शहरात एकूण ९,९३७ सक्रीय रूग्ण असून त्यापैकी सुमारे ५० टक्के ४,४८१ रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. तरीही शहरात बेड्सची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. याची पाहणी करण्यासाठी पालिकेने कुठल्याही प्रकारची यंत्रणा तयार केलेली नाही.
खासगी डॉक्टरांकडून होम आयसोलेट असलेल्या रूग्णांना उपचाराची सेवा दिली जात आहे. मात्र बदल्यात १० ते २० हजार रूपयांचे शुल्क वसूल केले जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी खासगी रूग्णालये व डॉक्टरांना होम आयसोलेशन असलेल्या रूग्णांकडून दहा दिवसांचे दोन ते तीन हजार रूपयेच शुल्क घ्यावे, असे बजावण्यात आले. नसता कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. मात्र याचे पालन होते आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाकडून तशी कोणतीही यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रूग्णांची आर्थिक लूट सुरूच आहे.
आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालास उशीर लागत असल्याने अहवाल आल्यानंतर प्रत्येक कोरोना रूग्णास शोधून कोविड सेंटर किंवा शासकीय व खासगी रूग्णालयात हलवण्यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाने कोणतीही वाहतूक यंत्रणा सध्या उभी केलेली दिसून येत नाही. त्यामुळे कोरोना रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाच शहरात उपचारासाठी बेड्सची शोधाशोध करावी लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियातून काही रूग्ण, लोकप्रतिनिधी संताप व्यक्त आजवर दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माझी जबाबदारी, मीच विसरलो…भाजप नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक टीका
- ‘सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न राहील
- लातूर अर्बन बँकेचे ‘अच्छे दिन’, १७ कोटी २८ लाखांचा नफा
- बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर
- जिल्हा बँकेत बोर्डीकर गटाची बहुमताअभावीच रिंगणातून माघार,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

