Share

भरधाव पेट्रोलटँकरच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : भरधाव पेट्रोलच्या टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चौघे जखमी झाले. तर चिमुकलीचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.३) सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबई महामार्गावरील खवड्या डोंगराजवळ झाला. यात आम्रपाली दिलीप सिरसाठ (वय ८, रा. खवडा डोंगर, तीसगाव) हिचा मृत्यू झाला. तर मजूर दिलीप मोहन सिरसाठ (३०), त्यांची पत्नी जयश्री मुलगा सिध्दार्थ आणि मेव्हणीची मुलगी डॉली भोसले असे जखमी झाले.

एमआयडीसी वाळुज भागातील जोगेश्वरी येथून तीसगावकडे दिलीप सिरसाठ हे दोन मुले, पत्नी व मेव्हणीची मुलगी यांना दुचाकीवर (एमएच-२०-बीडी-६४६७) बसवून जात होते. सिरसाठ यांची दुचाकी मुंबई महामार्गावरील खवड्या डोंगरजवळ आलेली असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टँकर (एमच-२२-एए-३३४४) चालकाने धडक दिली. या अपघातात सिरसाठ यांच्या हातापायाला व तोंडाला जबर दुखापत झाली.

तर मुलगा सिध्दार्थ याच्या गुडघ्याला मार लागला. तसेच मुलगी आम्रपाली हिच्या डोक्याला व पायाला मार लागून ती बेशुध्द झाली. तिच्यासह सिरसाठ आणि सिध्दार्थ यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी पावणेएकच्या सुमारास आम्रपालीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावरुन टँकर चालकाविरुध्द एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!