Share

‘मी मुख्यमंत्र्यांना वश केले असे म्हणणे हा निव्वळ बालीशपणा’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी गिरीश महाजन आणि भाजपवर टीका केली होती. पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यातील संतांकडून वशीकरण मंत्र घेतला आहे. या मंत्रानेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना वश केले असून ते सांगतील तेवढेच मुख्यमंत्री बोलतात असं विधान केले होते.

तसेच जिल्ह्यातील एक नेता रोज राष्ट्रवादीला डिवचतोय. त्याला हरविणे हे आपले पहिले लक्ष्य राहणार आहे. गिरीश महाजनांना यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याकडेही असा मंत्र आहे असंही विधान पाटील यांनी केले आहे. ते जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

पाटील यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर देताना राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांनी केलेलं वशीकरणाचं विधान बालिश आहे, त्यांनी आपल्या वडलांचं नाव न लावण्याची तयारी करावी, असं उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाजन यांच्या या उत्तराचे राष्ट्रवादीमध्ये काय पडसाद उमटतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ५०-५० टक्के जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं असलं, तरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना हा दावा फेटाळला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!