🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- केंद्र आणि राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. इडी आणि सीबीआयचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना धमकावले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पवार भाजपवर आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रीया जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत दिली आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला.
निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. लोकशाहीला आघात करण्याचा हा प्रकार आहे, आरोप पवार यांनी केला आहे.
महाजनांचा पलटवार
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांना पक्ष टिकवायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत.स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पवार भाजपवर आरोप करत आहेत.
सगळ्यांचा विश्वास आता भाजपवर आहे. ज्यांनी चुकीचे काम केले आहे त्यांना चौकशीला सामोरे जावेच लागणार.’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

