🕒 1 min read
पुणे: जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांचे पथक या प्रकरणी तपासासाठी जळगावला गेले होते. आता तिथून टेम्पोभर कागदपत्रे पोलिसांनी पुण्यात आणली आहेत. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होणार का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत. जी कागदपत्रं संस्थेत असणं आवश्यक आहेत ती दुसरीकडं आढळल्यानं या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अॅड. विजय पाटील (Adv. Vijay Patil) यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी आणलेल्या कागदपत्रातून काय माहिती मिळते आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होणार का, अशी चर्चा जोर धरत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आरएसएस एखाद्या वाळवीप्रमाणे असून…”, दिग्विजय सिंह यांचे टीकास्त्र
- योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले, असे वक्तव्यं कराल तर…
- मुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद देखील अहोरात्र मेहनत करणाऱ्यांनाच मिळते का?- अतुल भातखळकर
- “शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा”, पडळकरांचा परबांना सल्ला
- ‘बाहुबली’तील ‘कटप्पा’ ला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
