Share

‘बाहुबली’तील ‘कटप्पा’ ला कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण (covid-19 positive) झाली आहे. यानंतर आता ‘बाहुबली’ (‘Baahubali’) या चित्रपटात ‘कटप्पा’ची भूमिका वठवणारा प्रसिध्द अभिनेता सत्यराज (sathyaraj) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.

दरम्यान अभिनेता सत्यराज यांना कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर काही दिवस ते होम आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर सत्यराज यांना कोरोनाची गंभीर लक्षणे दिसू लागली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या चेन्नईतील एका रुग्णालयात (private hospital,Chennai) त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आल्याची, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे चाहते सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत आहेत.

https://www.instagram.com/p/CM_vLmDprmj/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेते सत्यराज व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता विष्णू विशालपासून महेश बाबू (Mahesh Babu), शोभना (Shobhana), मधुर भांडारकर, (Madhur Bhandarkar) सोनू निगम, अर्जुन रामपाल, एकता कपूर आणि राजेंद्र प्रसादपर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच पोस्टद्वारे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा, सुरक्षित रहा असा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!