टीम महाराष्ट्र देशा : कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. मात्र अखेर बंगळूर येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश कर्नाड हे सिने – नाटक – साहित्यसृष्टीतले प्रतिभावंत व्यक्ती होते. त्यांच्या या बहुरंगी कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गिरीश कर्नाड हे जरी कन्नड लेखक असले तरी त्यांनी मराठी नाटक, सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. तसेच तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचं दिग्दर्शन देखील केलं. अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही त्यांची ख्याती होती.
गिरीश कर्नाड यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराचे देखील ते मानकरी ठरले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

