Share

जगायचे असेल तर लस घ्या; अन्यथा… लस न घेणार्‍यांना औरंगाबादच्या मनपा आयुक्तांनी दिला इशारा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. तरी अनेक नागरिक लस घ्यायला तयार नाहीत. जगायचे असेल तर लस घ्या. आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत, तरी अनेक नागरिक लस घ्यायला तयार नाहीत. लस घेतलीच पाहिजे, लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी रुग्णाला फारसा त्रास होणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरजच पडणार नाही, असे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) यांनी व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले, मनपाकडे सुमारे ७५० ऑक्सिजन बेड, गरवारेच्या कोविड सेंटरमध्ये १२५ बेड आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटक, प्रवाशाची तपासणी करण्यात येत आहे. घाटीत जिनोम सिक्वेंसिंग लॅब तयार होणार आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पाच सहा येत होती. रविवारी ही संख्या अचानक १०पर्यंत गेली. ही लक्षणे हितावह नाहीत.

तज्ज्ञांनी जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीत तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तविला आहे. सर्वत्र रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आता आपले कर्तव्य पार पाडायला हवे. प्रशासनाला सहकार्य करावे. लस घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबाला दुःखात टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ७६ हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांनी डोस घ्यावा म्हणून ‘हर घर दस्तक’ मोहिमेद्वारे आम्ही त्यांची समजूतही घालत आहोत. तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेला लागणारी औषधे जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!