बीड: सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच परेशान करून सोडले आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव आणखी वाढण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण ही मोहीम सर्वत्र जोरात सुरु आहे मात्र अनेक नागरिक निष्काळजीपणा करत आहेत. तसेच कोविशिल्ड व कोवॅक्सीन या लसींना मान्यता मिळाली असूनही या बाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम आहे. या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी कडा येथील एका नाभिकाने वेगळाच उपक्रम सुरु केला आहे.
कडा येथील लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी येथील नाभिक समाजातील युवक रवींद्र गायकवाड यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ती म्हणजे ज्या व्यक्तीचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, त्यांची दाढी मोफत करण्यात येईल आणि दाढी करताना मास्क, सॅनिटायझर आणि कोरोना प्रतिबंधक सगळ्या उपाययोजना करून ही दाढी करण्यात येणार आहे.
दाढी मोफत करवून घ्यायची असेल तर त्यासाठी लसीचे दोन डोस पूर्ण झालेले ऑनलाईन प्रमाणपत्र व आधार कार्ड हे ग्राहकांनी आणणे बंधनकारक आहे. रवींद्र गायकवाड या युवकाच्या या योजनेची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू असून राज्यभरातून या युवकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

